या सुंदर जीवनात कधी कधी.......
पडायच असत प्रेमात कधी
झुरुन दुसर्यासाठी बघायाच कधी कधी॥
पाहताना तिच्याकडेच दाखवायच असत
विचारात गुंतल्यासारख कधी कधी
रात्री पहायची असतात स्वप्ने तिचीच…
जागुन अशी रात्र काढावी कधी
नंतर “जागली होतिस का रात्री?”
म्हणून विचारावे कधी कधी॥
मागायचा असतो देवाकडे॥
हात तिचा चोरुन कधी
द्यायच असत आश्वासन त्यालाही
पाच रुपयाच्या नारळाचे कधी कधी॥
चुकवायच्या असतात नजरा सर्वांच्या
विषय तिचा निघाल्यावर कधी
असते रागवायचे लगेच
अस काही नाहिये” म्हणून
विरहात तीच्या …
असते रडायचे गुपचुप आतुन कधी कधी
पाहुन हात तिचा दुसर्या हाती
हसायचे असते लपवुन दुख: कधी कधी॥
पडायच असत प्रेमात कधी कधी
बघायाच असत झुरुन दुसर्यासाठी कधी............
Tuesday, February 17, 2009
Subscribe to:
Posts (Atom)