Tuesday, February 17, 2009

प्रेम करायच असत........

या सुंदर जीवनात कधी कधी.......
पडायच असत प्रेमात कधी
झुरुन दुसर्‍यासाठी बघायाच कधी कधी॥

पाहताना तिच्याकडेच दाखवायच असत
विचारात गुंतल्यासारख कधी कधी
रात्री पहायची असतात स्वप्ने तिचीच…

जागुन अशी रात्र काढावी कधी
नंतर “जागली होतिस का रात्री?”
म्हणून विचारावे कधी कधी॥

मागायचा असतो देवाकडे॥
हात तिचा चोरुन कधी
द्यायच असत आश्वासन त्यालाही
पाच रुपयाच्या नारळाचे कधी कधी॥

चुकवायच्या असतात नजरा सर्वांच्या
विषय तिचा निघाल्यावर कधी
असते रागवायचे लगेच
अस काही नाहिये” म्हणून

विरहात तीच्या …
असते रडायचे गुपचुप आतुन कधी कधी
पाहुन हात तिचा दुसर्‍या हाती
हसायचे असते लपवुन दुख: कधी कधी॥

पडायच असत प्रेमात कधी कधी
बघायाच असत झुरुन दुसर्‍यासाठी कधी............

Saturday, January 3, 2009

मैत्रीन

एक तरी मैत्रिण अशी हवी
जरी न बगता पुढे गेली तरी
मागुन आवाज देणारी

आपल्यासाठी हसणारी
वेळ आली तर आश्रू ही पुसनारी
स्वताच्या गासातला गास काडून ठेवणारी

वेळ प्रसंगी आपल्या वेड्या
मैत्रिणीची समजूत काढनारी
वाकड़ पाउल पडताना मात्र
सरळ मग्रावर आणनारी

यशाच्या शिक्रावर
आपली पाठ थोपतनारी
सगळ्या चगलक्यात
आपणास सैरावैरा शोधणारी

आपल्या आठवणीत
आपण नसताना व्याकुल होणारी
खरच अशी एक तरी
जिवाभावाची मैत्रिण हवि जी
आपल्याला मित्र म्हननारी